जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?

सगळ्यात प्रथम निवेदन करतो की इथे मांडलेली मतं हि माझी वैयक्तीक मतं आहेत आणी माझ्या 40 वर्षाहुन अधीक या क्षेत्रातील अनुभवातून आलेली आहेत. काही अनुभवी लोकांची वेगळी मतं असु शतात व मी त्यांचा आदर करतो. माझ्या काही सहकार्‍यानी आणी मीत्रानी या विषयावर विचारणा केली म्हणून मी माझे विचार व्यक्त करत आहे.

आपल्याकडे तीन प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.
1. Ethically promoted Prescription medicines
2. PCD (propaganda cum distribution) medicines
3. Generic medicines

या तीन्ही मधे काय फरक आहे व काय साम्य आहे हे जाणून घेवूया.

1. Ethically promoted prescriptiom medicines: हि मेडीसीन्स कंपनीचे MR डाॅक्टरना प्रमोट करतात व हि मेडीसीन्स डाॅक्टरांर्‍या Prescripion ने केमीस्टकडून पेशंटना विकली जातात. ह्या कंपन्या पूर्ण देश किंवा बर्‍याच राज्यात operate व विक्री करतात. यातील बहुतेकांची स्वताची Production Units आहेत.  यांची मार्केट इमेज व Brand image चांगली असते व Quality perception हा महत्वाचा USP असतो.

2` PCD Medicines: काहि MR, chemist किंवा औषधी कंपन्यामधे काम करणारे कर्मचारी हि स्वताचा उद्योग सुरु करण्याची संधी म्हणून बघतात. हे P2P तत्वावर उत्पादन संस्थांकडून आपल्या नावावर छोट्या प्रमाणात उत्पादन करुन घेवून ठरावीक डाॅक्टर आणी/अथवा केमीस्ट थ्रू विक्री करतात. यात संबधीत तीन्ही पार्ट्यांचे Economic interst गुंतले असल्याने उत्पादन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात Quality compomise होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. Generic Medicines: हि औषधे केमीस्टद्वारा discount pricing ने विकली जातात. ग्राहकाला discount देवूनहि केमीस्टला भरपूर जास्त Margin रहात असल्याने केमीस्ट Generic Medicines प्रमोट व विक्री करण्यात intersesr घेण्याची व डाॅक्टरनी लिहून दिलेली औषधे generic medicines ने substitute करण्याची शक्यता असते. Discount देत असल्यानने हि औषधे कमी खर्चात तयार करण्याचा प्रयत्न असतो तसेच हि औषधे P2P करून घेत असताना उत्पादन किमत हा यातला महत्वाचा घटक असतो. Generic Medicines चा व्यवसाय तेजीत असल्याने मोठ्या कंपन्याही या Generic Medicinesच्या धंध्यात आल्या आहेत.

Prescription Substitution: बर्‍याचवेळा अस घडत की prescription मधील एक दोन औषधे केमीस्टकडे उपलब्ध नसतात. पेशंट दुसरीकडे गेला तर shortterm व longterm नुकसान होण्याची शक्यता! केमीस्ट विचारतो Same composition चे दुसरे औषध चालेल का? आणी PCD किंवा Generic medicine पेशंटच्या गळ्यात उतरवतो. तर काहीवेळा किमती बघून पेशंट वा नातेवाईकच विचारतात की स्वस्त पर्याय आहे का? इथे Generic substitute डिस्काऊंटने दिला जातो कारण Same composition!
आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी "Generic किंवा PCD medicine जेंव्हा prescription substitute केले जाते तेंव्हा ग्राहकाची (पेशंट वा नातेवाईक) त्याला समती असते अगदी कळत नकळत आणी ग्राहक आपल्या जबाबदारीवर substitute  accept करतो. 

आता या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा....
Same composition means same effectivity?
Same comosition असेल तर Same effect असेल अस समजण म्हणजे 'एकाच भाजीवाल्याकडून जर 5 बायकानी भाजी विकत घेतली तर पांचही घरी सेम चवीची व सारखीच भाजी बनेल' अस समजण्यासारख आहे.
प्रत्येकीच्या मसाल्यात, मसाल्याच्या प्रमाणात तसेच पाण्याच्या प्रमाणात फरक असु शकतो. भाजीची चव त्यानुसार बदलणार, तसेच प्रत्येकीची बनवण्याची पद्धत तीखट मीठाचे प्रमाण वेगळे.
औषध उत्पादन करतानाहि Label composition शीवाय Excipients जसे की Binding agents, sweetners, flavours, suger starch etc आणी यांचे प्रमाण उत्पादक कंपनी ठरवते. कंपनीतील infrastructure तसेच औषध उत्पादनाची कंपनीची Standard operative procedure (SOP) ठरते. Label composition जरी same असले तरी Excipients, त्यांचे प्रमाण व SOP follow करण्यावर या औषधांची effectivity अवलंबून असते. Infrastructure व procedures तपासुन या उत्पादन कंपन्याना GMP, ISO व तत्सम प्रमाणपत्रे दिली जातात. यांच्यामुळे तसेच आधीच्या आपल्या व सहकार्‍यांच्या अनुभवावरुन डाॅक्टर विश्वासाने पेशंटला ती औषधे लिहून देतो. जेंव्हा केमीस्ट ती substitute करतो किंवा पेशंट generic medicines घेतो तेंव्हा तो विश्वास गमावला जातो.
मला कुठेहि अले म्हणायचे नाही की PCD किंवा Generic medicines हि गुणवत्तेत कमी असतात पण Quality चा विश्वास? आणी स्वस्तात उत्पादन करण्याच्या प्रयत्नात process compromise ची नाकारता न येणारी शक्यता मनात कुठेतरी धाकधूक निर्माण करते.
शेवटी एवढेच सांगेन

Substitution पेशंटच्या/ग्राहकाच्या समतीनेच होते व पूर्ण जबाबदारी त्याची असते.
FDA, IMA किंवा तत्सम कुठलीहि संस्था Substitution ला समती देत नाही.

वरील मते हि माझी वैयक्तीक अनुभवातून आलेली आहेत. तुमची मते वेगळी असतील तर ती तसेच आपले अभीप्राय जरूर कळवावेत.








Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस