गेले ते दिवस
सहामाहि परीक्षा संपली की दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायचे. तसेच किल्ल्याचेही. मीत्रमंडळीत चर्चा सुळरु व्हायची. माती आणायला नदीकाठी कधी जायचे. कुणी कुणी जायचे? कुणी म्हणायचे मी नाहीय किल्ला करायला ...परवा आजोळी जातोय. दुसर्याला लगेच आठवायचे... अरे मी पण मामाकडे जाणार आहे. तीथे आम्ही शेतात किल्ला करणार! मग घरासमोर किल्ला चांगला कि शेतातला चांगला यावर गहन चर्चा. किल्ला बनायला सुरु झाला की बाबांपुढे फटाके आणायची भुणभुण सूरु. मग एक दिवस सख्खे चुलत मावस सगळ्याची वरात फटाके आणायला. बाबा काका मामा याना घरुन सुचना होत्याच की मोठे फटाके बाँब नाही द्यायचे. एकतर जीवाला घोर आणी दुपारच्या झोपेच खोबर. तरी फटाके यायचेच. मग त्याची वाटणी त्यात वाद ती मजा औरच. दिवाळीच्या फराळाची देवाण घेवाण. थंडीत ते तेल उटण खसाखसा चोळुन देणारी आई काकू. ती ओवाळणी ती भाऊबीज..... गेले ते दिवस..... दिवस पुढे गेले. आता काॅलेजच्या हाॅस्टेल रुममधे चर्चा ....पाम येताना आउच्या हातचा बेसनाच्या लाडूंचा डबा नसेल तर रुममधे एंट्री नाही हां आताच सांगून ठेवतो. अरे ए लाडू ठेव बाजूला ...इथे टर्म सुटेल की नाही याच टेन्शन आहे. उगाच पिक्चरल...