अबू आणी अबूचे कँटीन

मला Govt College of Pharmacy, Karad येथे B Pharmacy ला Admission मीळाली. काॅलेज सुरू होऊन 15 दिवस झाले होते. मेरीट लीस्ट मधे खुप खाली असण्याचा परीणान.
Admission घेतली. Sports quota मधून होस्टेल admission पण झाली. खुशीतच सांगली गाठली. दोनचार दिवसानी बाडबिस्तरा घेऊन कराडला जायचे. महत्वाचे म्हणजे जायच्पा आधी Willingdon मधील FY BSc ची admission कॅन्सल करून Relieving Certificate घेणे कारण त्या शीवाय B Pharmacy ची admission Final झाली नसती. हि झाले. माझ्या काकानी जे माझे Guardian हि होते मला सांगीतले साधारण तुझा महिन्याचा खर्च 400/— ते  500/— रूपये असेल. तू जर त्यातले 100/— स्वता कमावलेस तर मला आवडेल व तुला Money Management पण शीकायला मीळेल. मीहि हो म्हणालो. कराडला आलो. हाॅस्टेलवर बिस्तरा टाकला.
काँलेज गावापासून लांब नदिपलीकडे. वाटेत फक्त SGM College. त्याला लागून खाशाबा जाधवची चाळ. खाशाबा जाधव म्हणजे भारतातला पहिला Olympic Medal विजेता. 1953 Helisinki Olympics मधे कुस्तीचे Bronz Medal जींकले होते. त्याला सरकारकडून हि जमीन मीळाली होती व त्याने चाळ बांधली. काॅलेजच्या मुलाना रूम्स व खानावळ, दोन्हीवर जाधव कुटुंबाचे गुजराण. तेथून अर्धा किमी Govt Engg College ची Building. त्यातली एक विंग Govt Pharmacy College. समोर Science College, मधे माळरान. काम कुठे मीळणार. 
एके सकाळी चहा प्यायला काॅलेज कँटीनमधे बसलो होतो व कामाबद्दलच बोलत होतो तर गल्ल्यावरुन आवाज आला 'तुझे काम चाहिये?' 
हां जी ....मी
वेटरका काम मीलेगा....(एक पाँज) .....करेगा? 200 रूपया मीलेगा.
हां करुंगा......मी
तुम्हारे classmate आयेंगे, सामनेवाली लडकियां आयेगी. ऐ वेटर चाय लावो बोलेगी. फिर भी करेगा?
हां करुंगा.....मी
तो कल सुबह 7 बजे आना, लेट नही चलेगा.
दुसर्‍या दिवसापासुन काम चालू. फक्त 15 दिवस ते काम केले. कारण काम करताना काहि सुचना कधी गरज लागली तर उशीरा थांबलो.
15 दिवसानी मालकानी 'अबूने" बोलावले
बेटा तेरा काम पसंद आया. कलसे सुबह 5 बजे मार्केट जाना सब्जी फल लाना और शामको 7 से 10 बजेतक गल्ला संभालना. तेरा पगार 300..... मी अवाक. 
नंतर कळले तो मला आजमावत होता.मी कोणतेही काम करायला तयार आहे हे पाहिले व मला अक्षरशा कवचाखाली घेतले. Secon Term ला आलो कामाला सुरुवात केली. Order आली 'तू चाय खानेका पैसा नही देनेका. फी का पैसा अलगसा लेनेका. घरसे पैसा मांगनेकु नही.'
कोण कुठला हा केरळचा अबू. काय संबंध! काम मागीतले आणी घरचा सदस्य काय झालो?
पुढल्या वर्षी
'अब तुझे पगार नही मीलेगा. तू मेरा Junior Partner. सुबहकी पुरी खरेदी तेरी जीम्मेदारी. जब जरूरत होगी गल्लेसे पैसा लेनेका. मुझे पुछनेकी जरूरत नही.'
मी लिटरली रडायला लागलो.
'ए कायको रोता है? रामू दो ग्लास दो नंबर काॅफी ला. ए साला इमोशनल हो गया' (दो नंबर काॅफी — 60 ml Old monk+ 60 ml Soda. Top the glass with black coffee) प्रमोद रोनेका नही. कल जब तू बडा अफसर बनेगा तब आजका दिन याद करनेका..
{आज हे लिहीताना मी परत रडतोय}
या अबू ने मला Final Year ला Sports Secretory ची निवडणूक लढवायला लावली. सगळा खर्च केला. मी निवडणूक जींकल्यावर बेभान नाचला.
अबूची एक अफलातून आठवण. 
काहि वर्षानी Marketinf Manager झाल्यावर कामासाठी कराडला गेलो. काॅलेजच्या कँटीनला गेलो. Order केली ' दो नंबरकी काॅफी'
गल्ल्यावरुन अबूचा मुलगा आला ' आप प्रमोद हो? पिताजी बहोत याद करते है. 
अबू कैसा है?..मी  (कैसे है ..तोंडातून कधीच निघाल नाही)
थोडीसी तबीयत ठीक नही है उनकी. आप घर आयेंगे तो अबू बहोत खुश होंगे. 
घरी गेलो. अबू खुश. एक प्रेमळ मिठी. दो नंबर काॅफी किती झाल्या कळलेच नाही. आम्ही बोलत होतो डोळे वहात होते. अबूच्या घरचे खीशीने पागल. अबूची बायको मला प्रेमळ दम देते कराड आके इधर नही आया तो देख तेरी खैर नही. सारा प्यार इन्हीको तो हम कहां जाये?
आज अबू नाही ते कँटीन पण नाही. अबूचा मुलगा PHD झाला. Engg cillege चा प्राचार्य म्हणून रिटायर झाला. जग पुढे पळतय..,,, कालाय तस्मै नम:
पण कधी मधेच दो नंबर काॅफी आठवते. अबूडोळ्यासमोर येतो. डोळे भरतात..,, 


Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?