गुरू जो राखी

Please read

🙏 *आयुष्य* 🙏

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....

         कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो.... 

        अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो 

         आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......

         आपण मग तो बोटाने शोधायला 
सुरूवात करतो......

            अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया, 
पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....

           थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....😀

           *आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?

            पाटीभर *आनंद* शेजारी असूनही, 
            आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....

           पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....
              आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....

 *आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...* 

🌹 *नेहमी आनंदी राहा* 

  

आमच्या शाळेतली बॅचमेट मैत्रीण संजीवनी बामणीकर हिने वरील खुप सुंदर पोस्ट फाॅरवर्ड केली. विवेचन वाचताना काहि छान आठवल. बघा आवडत का.

गावी (कोणत्याहि खेडेगावी) सकाळी गाईम्हशी चरायला जाताना बघणे नेहमीचेच. नेहमीचेच असल्याने आपण तीकडे लक्ष देत नाही. नाही गुराख्याकडे लक्ष देतो. कधी नीट बघीतलय का?

1. गुराखी एक तर म्हातारा साधारण साठीपल्याडचा असतो. कारण एक एवढ्या वर्षात गाईम्हशीना त्याची सवय झाली असते आणी दुसर महत्वाच कारण की साठीच्या खालची लोक शेतात राबत असतात.
2. हा साठी पल्याडचा गुराखी बहुतेक वेळा गुरांच्या मागुन चालत असतो. You should lead from front किंवा They accept you if walk along with step by step असले मॅनेजमेंट फंडे बोलायला ठीक असले तरी सगळ्यांवर लक्ष ठेवायचे असेल तर मागुनच चालाव लागत, ऐटीत छाती काढून सर्वांच्या पुढून चालल तर मागच्या मागे कोण पसार होईल सांगता येत नाही.
3. हा गुराखी शांतपणे गुरांच्यामागुन चालत असतो. तो उगाच गाईम्हशीना टोकत नाही. पण गायरानात पोचण्याआधी गावाकसातच रस्त्याकडेला थोडस गवत दिसल आणी एखादी गाय किंवा म्हैस तीकडे निघाली तर गुराखी तीला परत रस्त्यावर आणतो व गायरानाकडे वळवतो (असेच कोणी तरी आपल्याला टरफलातील शेंगदाणा हुडकण्याऐवजी पाटीतील शेंगाकडे वळवले पाहिजे) तसेच रानात एखादा सापळा रचलेला असेल व वरती गवत आच्छादले असेल तर तीकडे आकर्षीत होणार्‍या गुराना परत रस्त्यावर आणतो.

असाच एक गुराखी नव्हे तर गुरू जो राखी हा आपल्या सर्वांजवळ असतो. 
1. तो किंवा ती आपल्या जीवनात नेहमी ढवळाढवळ करीत नाही. पण आपल्या आयुष्यात काय चाललय आणी आपण कसे मार्गक्रमण करतोय इकडे लक्ष असते.
2. जेंव्हा आपण पाटीभर शेंगा सोडून हरवलेला एक दाणा हुडकत असतो तेंव्हा तो आपल्याला जाणीव करुन देतो की पाटीभर शेंगा आहेत तीकडे बघ.
3. जेंव्हा आपण क्षणीक मोहाला बळी पडून संकट ओढवून घेत असू तर हा गुरु आपल्याला सावध करतो.

आता हा गुरु जो राखी आपल्याला सल्ला देतो तेंव्हा ते गंभीरतेने घ्यायचे की पाटीभर शेंगा सोडून टरफलात हरवलेला शेंगदाणा शोधत बसायच ते आपण ठरवायचे.

हा गुरु जो राखी मार्गदर्शक आपल्या प्रत्येकाजवळ असतो. आईवडील किंवा भाऊबहिणीच्पा रूपात असतो तर कोणाजवळ सहाध्यायी किंवा सहकारी रूपात असतो. बर्‍याचजणांसाठी मीत्र किंवा मैत्रीणीच्या रुपात असतो तर कोणासाठी आपण पण मार्गदर्शक असु शकतो. 

संजीवनीच्या पोस्टने हि विचारशृंखला सुरु झाली ThanQ संजीवनी.
आपले अभीप्राय जरुर शेअर करा🙏


Popular posts from this blog

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?