मेडिसीन्स एक्स्पायरी डेट

या विषयावरची पोस्ट बरीच व्हायरल झालीय. माझ्या 7 ते 8 ग्रुपवर पण फिरते आहे. मी त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. पण तीनएक दिवसापुर्वी दोनतीन डाॅक्टरांकडून विचारणा झाली की exiry dae ला खरच काही अर्थ आहे का? Expiry date नंतर किती दिवस ते औषध घेणे safe आहे? त्यांच्याशी बरीच चर्चा झाली. मग कालपरवा एका senior pharma prodction managerने पोस्ट परत पाठवून माझे मत विचारले. तसे माझे विचार मांडवे असे वाटल्याने मी लिहीत आहे.
सर्वप्रथम ती पोस्ट संदर्भासाठी खाली देत आहे. नंतर माझे विचार वा मते जी माझ्या अनुभवावर आधारीत आहेत व ती मांडताना कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. मतमतांतरावर चर्चेच स्वागतच असेल.

💊 औषधांच्या एक्सपायरी डेटबद्दल सत्य

1979 पूर्वी औषधांच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट छापलेली नव्हती.
ही पद्धत 1979 मध्ये अमेरिकेत सुरू झाली.

खालील माहिती डॉ. मोहन श्रीधर (फ्लोरिडा, USA) यांनी शेअर केली आहे.

❓ औषधे खरोखर एक्सपायर होतात का — की आपण फार्मास्युटिकल उद्योगाकडून दिशाभूल होत आहोत?

लेखक: रिचर्ड आल्टशुलर

कल्पना करा:
तुमच्याकडे टायलेनॉल (पॅरासिटामोल) ची बाटली आहे, ज्यावर लिहिले आहे — “June 1998 नंतर वापरू नका.”
आता August 2002 आहे.
तुम्ही ती औषध घ्यावी का फेकून द्यावी?
ती हानिकारक ठरेल का?
की फक्त थोडी कमी प्रभावी असेल?

हा प्रश्न एक मोठा मुद्दा उभा करतो —
जेव्हा उत्पादक एक्सपायरी डेट छापतात, ते खरोखर आपले संरक्षण करत आहेत का,
की हा फक्त अधिक औषधे विकण्यासाठीचा एक मार्केटिंग ट्रिक आहे?

सत्य जाणून घेण्यासाठी मी वैद्यकीय डेटाबेस आणि संशोधन पेपर्स तपासले.
हे मला समजले 👇

पोस्ट शेअर करीत आहे.

🧠 एक्सपायरी डेटबद्दल सत्य

1. एक्सपायरी डेट — जी 1979 पासून अमेरिकेत कायदेशीररित्या आवश्यक आहे — याचा अर्थ फक्त इतकाच की त्या तारखेपर्यंत औषध पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असेल याची उत्पादक हमी देतो.
    याचा अर्थ असा नाही की त्यानंतर औषध असुरक्षित किंवा निरुपयोगी होते.
2. तज्ञांच्या मते: बहुतेक औषधे एक्सपायरीनंतरही अनेक वर्षे सुरक्षित आणि प्रभावी राहतात.
3. अभ्यासानुसार, कालांतराने औषधांची ताकद थोडी कमी होऊ शकते, पण ती पूर्णपणे निष्प्रभ होत नाहीत.
4. अनेक प्रकरणांमध्ये, औषधे एक्सपायरीनंतर 10 वर्षांनीही सुमारे 90% प्रभावी राहतात.

🧪 सर्वात मोठा अभ्यास — अमेरिकन सैन्याने केलेला

The Wall Street Journal (29 मार्च 2000) नुसार:
अमेरिकन सैन्याकडे एकदा $1 अब्ज पेक्षा जास्त किमतीची औषधे साठवलेली होती.
नियमांनुसार, ही औषधे दर 2–3 वर्षांनी फेकून द्यावी लागत होती — ही प्रचंड नासाडी होती.

म्हणून सैन्याने, U.S. FDA सोबत मिळून, या औषधांचा खरा शेल्फ लाइफ तपासण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला.

त्यांनी 100 पेक्षा जास्त प्रकारची औषधे तपासली —
आणि आढळले की सुमारे 90% औषधे एक्सपायरीनंतर 15 वर्षांपर्यंत सुरक्षित आणि प्रभावी राहतात!

या प्रकल्पाचे संचालक फ्रान्सिस फ्लाहर्टी यांनी सांगितले:

“एक्सपायरी डेट म्हणजे त्या वेळेनंतर औषध अस्थिर किंवा धोकादायक होते असे नाही.”
“उत्पादक एक्सपायरी डेटचा वापर वैज्ञानिक कारणांपेक्षा मार्केटिंगसाठी अधिक करतात.”

माजी FDA अधिकारी जोएल डेविस यांनीही सांगितले:

“नायट्रोग्लिसरीन, इन्सुलिन आणि काही द्रव अँटिबायोटिक्स यांसारख्या काही अपवाद वगळता, बहुतेक औषधे आश्चर्यकारकपणे दीर्घकाळ टिकतात.”

💊 अॅस्पिरिनचे उदाहरण

Bayer कंपनीने 4 वर्षे एक्सपायरी झालेल्या अॅस्पिरिनची चाचणी केली — आणि ती 100% प्रभावी आढळली!

औषध स्थिरतेचे तज्ञ डॉ. जेन्स कार्स्टेन्सन यांच्या मते:

“5 वर्षांनंतरही Bayer अॅस्पिरिन उत्कृष्ट स्थितीत होती.”

💰 लपलेले सत्य

हे सर्व वाचल्यानंतर स्पष्ट होते की फार्मास्युटिकल उद्योग दरवर्षी अब्जावधी डॉलर्स कमावतो —
कारण लोक “एक्सपायर्ड” औषधे फेकून देतात, जी अजूनही वापरण्यास योग्य असतात.

🗣️ सत्य शेअर करा


आता चर्चेला सुरुवात करताना 
1979 पुर्वी expiry date लेबलवर print होत नव्हती व 1979 पासून पहिले US FDA व नंतर  इतर देशानी कायद्यानुसार ते सक्तीचे केले. म्हणजे expiry date हा concet फार्मा कंपन्यानी नाहीतर Regulatory Authorities नी आणला. त्यानी फार्मा कंपन्याकडूनच Stability and safety data घेवून  shelf life aprove केला. आजही नवीन औषध बाजारात येण्यापुर्वी Accelerated stability and safety Data तपासला जातो व shelf life approve केले जाते.हे approval अमेरिकेत USFDA भारतात CDSCO तसेच इतर देशातील तत्सम Regulatory Authorities करतात. तर कंपन्यांच्या फायद्यासाठी त्यानी exiry date छापायला सुरूवात केली यात काही तथ्य नाही. 

दुसरा महत्वाचा मुद्दा
आपण expired medicines फेकून देतो पण Pharma Industry आणी Chemist and Druggist Associatin यामधील ठरावानुसार केमीस्ट व स्टाॅकीस्ट expired medicines ठरावीक मुदतीत कंपनीला परत पाठवु शकतात व फार्मा कंपनीला त्यांची free relacement देणे बंधनकारक असते. त्याशीवाय जमा झालेल्या expird medicine ची विल्हेवाट लावण्यासाठी जी process Authorities नी ठरवली आहे ती बरीच खर्चीक आहे. तर expiry हा फार्मा कंपन्यासाठी direct loss आहे फायदा नाही. {फार्मा कपन्या म्हणजे नैतीकतेचे पुतळे असा माझ अजीबात दावा नाही. पण expired medicines हा फायद्याचा स्त्रोत नाही एवढ मात्र खरय}

आणी एक मुद्दा वरील पोस्टमधे प्रकर्षान मांडला आहे तो म्हणजे expiry period नंतरही मेडीसीनची potency फार काही कमी होत नाही.
यावर विचारविमर्श करताना मेडीसीनच्या बाबतीत
Standard limits, shelf life आणी expiry date हे cpncepts समजून घेणे आवश्यक आहे.

Standard limits: प्रत्येक औषधाची standard limits ठरलेली आहेत व प्रत्येक देशाच्या Phrmacopia मधे ती समावीष्ठ आहेत. 
उदाहरणार्थ Paracetamol चे Standard limits हे 95 to 105% आहे. म्हणजे on analysis लेबल क्लेमच्या 95% ते 105% paracetamol असले पाहिजे. थोडक्यात जर Dolo 650 टँबलेटचे analysis केले तर त्यात paracetamol content हा minimum 617.5 ते maximum 682.5 mg असला पाहिजे. नाहीतर ते medicine substandard ठरवले जाईल.

Shelf life: Time taken to deteriorate to minimum of standard limit. म्हणजे औषधाच्या standard limit पर्यंत deteriorate होण्यास लागणारा कालावधी. Dolo 650 चेच उदाहरण घेतले तर Dolo 650 टँबलेट मधील paracetamol 650 mg पासून 617.5 mg पर्यंत deteriorate होण्यास लागणारा कालावधी.हा जर 3 वर्षे असेल तर Dolo 650 चा Shelf life 3 वर्ष. हा कालावधी Accelerated stabilty study ने ठरवला जातो जो study तपासून Regulory Authority approve करते.

Expiry date: Period of shelf life from date of manufacturing. किंवा औषध तयार केलेल्या तारखेपासून Shelf lifeचा कालावधी संपेपर्यंत.वरील उदाहरण घेतलेतर Dolo 650 किंवा तत्सम paracetamol tablet जर shelf life 3 वर्षे ठरवले असेल तर expiry date हि औषध टयार केलेल्या तारखेपासून 3 वर्षानी अशी print केली जाते. उदाहरणार्थ जर ते औषध May 2026 मधे तयार झाले असेल तर expiry date हि April 2029 असेल.

Potency थोडीफार कमी झाली तर एवढा काय फरक चडतो असाही सूर त्या पोस्टमधून दिसून येत होता आणी उदाहरण Paracetamol tablet चे दिले होते. हे औषध अंगदुखी डोकेदुखी ताप यांच्यावरील उपायासाठी वापरले जाते. खर आहे थोडीफार potency कमी झाल्याने फारसा फरक पडत नाही पण हेच paracetamol जेंव्हा post operative pain relief साठी वापरले जाते तेंव्हा potency थोडीहि कमी झालेली चालेल का?

तसेच Antibiotcs ची potency कमी झालेली अजीबात चालणार नाही कारण एकतर infection वेळेत कमी होणार नाही आणी त्यापेक्षा जर Antibiotic resistance develop झाला तर अजुनच कठीण परीस्थीती होईल.
Enzymes, biologcal products सारख्या औषधांची expiry date अजुन कमी कालावधीची असते कारण त्यांचे deterioration fast होते तसेच on storage microbial growth होण्याचीहि शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात expiry date नंतर ते औषध घेणे शक्यतो टाळावे. आणी खालील औषधाबाबतीत अधीकच काळजी घ्यावी.
Antibiotics
Digestive Enzymes
Insulin
Vaccines
Protein preperation
Biological Products

 अजुन बरच लिहीता येण्यासारखे आहे. पण आता थांबवतो. कोणाला अजुन चर्चा करायची असेल' शंका असतील तर स्वागत आहे.

वर मांडलेली माझी व्यक्तीगत मतं आहेत. कुणाचे विचार वेगळे असु शकतात व त्यांचा मी आदर करतो.






Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस