Bholanath

नविन भोलानाथ 😀😀

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का
पाऊस पडुन पटेल चौकातील भजी खायला मिळेल का
सांग सांग भोलानाथ 

उद्या जाणार आहे मी मधुबनच्या कट्ट्यावर
ते जुने सारे दोस्त तीथे पुन्हा भेटतील का
गप्पा मारत अर्धा अर्धा चहा शेअर करतील का
सांग सांग भोलानाथ

अकरावी अ च्या त्या बाकावर आता बसलो तर
सर शिकवतात ते आता तरी डोक्यात जाईल का
परीक्षेत जरा बरे मार्क यावेळी तरी मिळतील का
सांग सांग भोलानाथ

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?