एक सुखद अनुभव

Positive Energy चा माझा अनुभव   

कोव्हिडच्या पहिल्या लाटेत शेजारच्या flat मधील तीघेजण +ve आले म्हणून घर sanitize करुन घेतले. Sanitize करायला एक तिशीतला पंजाबी तरूण आला होता. त्याने sanitizationची जरुरी माहिती दिली व कामाला सुरूवात केली. आम्ही बोलत होतो. बोलणे हिंदि मराठी व english मधे काम करता करता सुरु होते.

कधीपासून हे काम करता?
२/३ महिने झाले.
आधी काय करत होता?
Kidzania मधे teacher आहे पण lockdown मुळे काम व पगार दोन्ही बंद झाले. वडलांचा Railway, शाळा व corporatesला sanitizer पुरवण्याचा व्यवसाय आहे. मग training घेतले व sanitization and pest control सुरु केले. Training चा उपयोग छान झाला.

 कुठेहि बोलण्यात कटुता नाही. पगार बंद झाल्याची तक्रार नाही. उलट सांगत होता की शाळेचे ऊत्पन्न थांबले तर पगार कुठून देणार?

काम वाखाणण्याजोगे. वापरत असलेल्या chemicals ची त्यातील ingradiantsची पूर्ण माहिती safety profile and precautions व्यवस्धित समजाउन सांगीतले. 
तो निघाला तसे बायको बोलली 
सगळीकडे फिरता infection risk वाढते. काळजी घ्या. तर म्हणाला
ताई काळजी करु नका मी पूर्ण काळजीपुर्वक काम करतो. तुम्हिपण काळजी घ्या. mask वापरा social distancing पाळा. आपण corona वर मात करु शकतो. 

त्याच्या बोलण्यात वागण्यात positive energy होती.  assurance होता व दुर्दम्य आशावाद होता..
एक सुंदर अनुभव घेतला.

आता मार्च २०२३ मधे pest control साठी Online Booking केले. हाच पंजाबी तरूण 'जीतेंदर सींह' परत भेटला. 

अरे शाळा सुरु झाली ना? माझा प्रश्न
हो पण मी हाच व्यवसाय करायचे ठरवले. आता ६ मुले व एक मॅनेजर बरोबर आहेत. तुमची query आली म्हणून मीच आलो.

वाह आता तू businessman झालास. मी
असाच मोठा हो. इती बायको
तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त. केंव्हाहि काहिही काम असेल आठवण करा. तुमच्याकडे मी स्वताच येत जाईन.

Positive energy, dedication to work, customer relationship असे मॅनेजमेंटचे सर्व धडे सहज व सुंदर मिळाले.

सुंदर अनुभव share करावा वाटला. जसे जमेल तसे लिहिले आहे.  

अभिप्राय जरुर लिहा. 


Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?