Ugly Duckling
गेल्या रविवारी Book shelf साफसफाइ करायला घेतले. पुस्तकं खाली काढत होतो. बायको टोमणे मारत होती. काय तुमची तिघांचि choice (म्हणजे मी, मुलगी श्रुती व मुलगा अक्षय) book shelf व furniture सगळ black & white मधे. माझ कोणी ऐकलच नाहि. कस दिसतय हे! मी आपल काहि उत्तर न देता (तसहि काय उत्तर देणार) पुस्तकं उतरवत होतो.
Management books (हौसेनी घेतलेली पण क्वचीतच वाचलेली) व Pharmacy books मधे दडलेल छोटस पुस्तक The Ugly Duckling दिसल आणि मन विसेक वर्षे मागे गेले.
MR training module बनवण्यासाठी मी हे पुस्तक विकत आणले. The Ugly Duckling वर training module तयार झाले. आर्टिस्टकडुन PPT design करुन घेतल्या. Presentation झाले. खूप कौतुकपण झाले. मन भुतकाळात रमले. पुस्तक पुन्हा वाचून काढले. समाधान होईना. मख U tube वर शोधून 'एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख...' ऐकले. गाण्याच्या व रेकाॅर्डिंग वेळच्या लतादिदि व आशाताईंच्या ऐकलेल्या आठवणी जाग्या झाल्या. विचारचक्र फिरायला लागले. गाणे मनात घोंगावु लागले.
त्या कुरुप वेड्या पिल्लाला सर्वानी छळल. ते बिचार कोपर्यात बसून रडल. आपण राजहंस आहोत हे कळण्याआधी त्याच शैशव, बालपण व तारुण्य संपून गेलं. अस का व्हाव?
एक विचार मनात आला. निदान आपण राजहंस आहोत हे त्या पिल्लाला कळल तरी. नाहितर आपण पाण्यात तरंगत फिरणार्या बदकांच्या पिल्लाप्रमाणे चाकोरीबद्ध जीवन जगण्यासाठी घाण्याच्या बैलासारखे गोलगोल फिरतो आहोत. अस का व्हाव? राजहंसाने बदकासारख का जगाव?
मग Mistair Health & Hygeine सुरु करुन नावारुपाला आणणारा विनय ठाकूर आपला विनयदा आठवला. जीवनाच्या मध्यात सुखाची नोकरी सोडून Distrbution सुरु करणारे सुरेश देशमुखसर आठवले. वर्गमीत्र व यशस्वी उद्योजक अजीत पाटील आठवला. Machines selection, erection to production consultancy रत्नाकर ठोंबरे आठवला. Production मधे व्यस्थ असतानाहि आयुर्वेदाची आवड सांभाळणारा व त्यायोगे सर्वाना मदत करणारा आमचा सुधीर देवधर आठवला. Aurangabad Karaoke Club सुरु करुन गाण्याची आवड जपणारा रतन नगरकर आठवला. Jiiga consultancy जतीन चंदाराणा आठवला. आणी Pharma Production GMP training and consultancy मधु व अतुल शिरगावंकर आठवले.
शाळेतले मित्रमैत्रीणी डोळ्यासमोर आले. बाबु कडवेकर, सतीश, अजीत मेहता विवेक यानी स्वताच विश्व कस निर्माण केल. बेंगलोरला english classes घेणारी अलका अष्टपैलू संध्या u tube वरची माधुरी आठवले. आयुर्वेद जगणारा चंदु असाच एक अवलिया. हे व ह्यांच्यासारखे अजून काही यानी आपण राजहंस आहोत हे ओळखले, कोणी लवकर तर कोणी थोड उशीरा.पण यानी जीवनाला अर्थ आणला. यांच्यावर लिहायचे तर एकेकावर एकेक पुस्तक होइल.
विचारचक्र चालू होते. आणि मनात चमकले की आपली मुलेही रुढ पायवाट सोडून नविन वाटा चोखाळत आहेत. जेंव्हा त्यानी त्या वाटेवर जायचे ठरवले तेंव्हा भिती काळजी वाटली. पण आज पटते की ती काळजी अनाठायी होती.
परत एक विचार आला. तरुणाईला राजहंस बनायच आहे पण आपण बरेच पालक त्याना धोपटमार्गाकडे ढकलत तर नाहि? आपणच बदलण्याची जरुर आहे का?
असो. विचारचक्र तुर्तास थांबवतो. सुरु झाल्यावर परत येईनच.