वसुधा रिटायर झाली

ती शांत साधी सरळ होती म्हणून हो म्हणालो
ती का हो म्हणाली कळलेच नाही
ना आई वडील ना सासू सासरे जवळ
संसाराची सुत्रे तीने हाती कधी घेतली कळलेच नाही
मी कामानिमीत्त नेहमी बाहेर असायचो
तीने मुलाना मोठे कसे केले कळलेच नाही
माझा चिडचिडा स्वभाव कामात तर कधी घरीपण चिडायचो
तीने शांतपणे कसे सांभाळून घेतले कळलेच नाही
कामावरची तिची निष्ठा कस्टमर्ंचा तिच्यावरती केवढा वाश्वास
कौतुक कसे करावे मला कधी कळलेच नाही
सहकारी रिटायर होतात तेंव्हा मी खुप छान बोलतो
३१मार्चला वसुधा खरच रिटायर झाली
तिच्या सहकार्‍यासमोर काय बोलावे कळलेच नाही

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?