मैत्री

🌱
सुंदर पोस्ट ग्रुपवर आली होती. आवडली म्हणून नावासकट फाॅरवर्ड केली.

एक मुलगा त्याच्या बंगल्याच्या बागेत रोपटं लावत होता… 
"काय करतोयस्?" त्याच्या मैत्रिणीने विचारलं
"दिसत नाही का?... झाड लावतोय" तो हसत हसत म्हणाला
"ते दिसतंय पण आज काय कारण आहे… आज काय विशेष… न्यू इयर डे म्हणुन का?"
त्यावर तो तिला जवळ घेत म्हणाला, "तसं नाही… आज तुझा वाढदिवस आहे आणि मी ठरवलंय की तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावणार" 
मुलगी जोरात हसली आणि म्हणाली, "सगळ्या गोष्टींप्रमाणे ही गोष्ट पण तू विसरून जाशील"
मुलगा म्हणाला, "अजिबात नाही… बघच तू… एक दिवस या जागेचा कोना-न-कोना तुझ्या नावाच्या झाडांनी व्यापून जाईल...  आपली मुलं सुना आणि त्यांची मुलं… यांच्या श्वासाबरोबर आज जाणाऱ्या ऑक्सिजनवर तुझं नाव असेल" 
"प्रॉमिस!... दरवर्षी माझ्या वाढदिवसाला इथे झाड लावशील?"
"पक्कं प्रॉमिस" मुलगा म्हणाला

अचानक त्यांच्या मधला धागा तुटला आणि नात्याची वीण उसवली… 
.
.
.
.
आज चाळीस वर्षानंतर ती परत या शहरात झाली होती…
चेहऱ्यावर साठीच्या सुरकुत्या आल्या होत्या, आणि केसात चांदी सुद्धा… 
तिने ठरवलं होतं की… आपला साठावा वाढदिवस त्याच्या बंगल्यावर करायचा… 
माहित नव्हतं त्याच्या घरी कोण असेल पण असेल… पण असतील त्यांच्याबरोबर करायचा…

ती बंगल्यावर गेली… 
तिने नजर फिरवली… 
बंगल्याच्या अंगणात खूप झाडं होती… 
सगळ्या झाडांवर एक दोन तीन असे एकोण-चाळीस पर्यंत नंबर लिहिले होते… 
तिशीचा एक मुलगा तिथे झाड लावत होता… 
तिने त्याच्याकडून माहिती घ्यावी म्हणून सगळं विचारलं…
तो म्हणाला "बाबांनी आयुष्यात कधीच लग्न केलं नाही… त्यांनी मला दत्तक घेतलं होतं… दरवर्षी एक जानेवारीला ते एक झाड लावत होते… आज मी चाळिसावं झाड लावत आहे"
"होते म्हणजे… तुझे डॅड कुठे आहेत?" तिने विचारलं… 
हे विचारताना तिच्या मनात एक वादळ उठलं होतं… 
तो मुलगा थोडा उदास झाला आणि म्हणाला "मागच्या वर्षी एका रोड एक्सीडेंट मध्ये ते गेले… त्यामुळे यावर्षीपासून ते झाड लावायची जबाबदारी आता माझी आहे"
ती काहीच बोलली नाही… 
थोड्या वेळाने तो मुलगाच म्हणाला…. 
"मी दरवर्षी त्यांना विचारायचो की… तुम्ही एक जानेवारीला असं झाड का लावता?... या मागचं कारण काय आहे?... आणि त्यांचे एकच स्टॅंडर्ड उत्तर असायचं की *उसने कहा था*"

थोड्यावेळाने बंगल्यांच्या पायऱ्यावर बसलेल्या तिला पाण्याचा ग्लास ग्लास देताना तो मुलगा विचारत होता "ऑंटी बरं वाटतंय का आता?... काय झालं होतं?... चक्कर आली होती का?"

Vक्रम
*#विक्रम_इंगळे*
 (फेसबुक)

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?