पोस्टल डे

प्रीय शालेय आणी महावाद्यालयीन मित्र आणी मैत्रीणीनो
काल 'पोस्ट डे' होता. साजरा झाला की नाही माहित नाही. कारण आज eMail, SMS and Whatsapp च्या जमान्यात पोस्ट विस्मरणात गेलय. पण आज पोस्टाची खुपच आठवण आली.  सांगलीच पोस्ट आॅफीस स्टेशन रोडवरच मोक्याच ठिकाण. समोर सिवील सर्जनचा बंगला (विद्याधर बोडस च घर व आमच क्रिकेटच मैदान) बाजुला सांगली बॅंक. थोड पुढ जाऊन डावीकडे वळल की राजवाडा व पुढे पटवर्धन हायस्कूल. 
पोस्ट म्हणजे पत्र. पत्र कसे लिहायचे ते सातवी आठवीत शीकलो. पत्राचा मायना मसुदा नमस्कार चमत्कार व शेवटी सही. त्यासाठी इंग्लीश सही शिकलो. नातेवाईकाना पत्र लिहायला सुरुवात झाली. पुढे काॅलेज हाॅस्टेल मुळे घरी नियमीत ख्यालीखुशाली पत्राने कळवणे सुरु झाले. 
पोस्टकार्ड ५ पेसे तर उत्तर जरुरीचे असेल तर जोडकार्ड ७ पैसे. पत्र मोठे असेल तर Inland ८ पैसे किंवा पाकीट १० पैसे. मजा होती.
पोस्ट तीथले ते डेस्क बसलेले निर्वीकार चेहरे पोस्टमन सगळच मोठ कुतुहल. तारविभाग हा आणी एक अगम्य विषय. त्यात तार येणे म्हणजे वाईट बातमी. भीतीच वाटायची.
खासगी व कामकाजीय पत्रव्यवहार त्यातला फरक त्यांची वेगळी लिखाणशैली हळुहळू समजत गेली उमजत गेली.
आता फक्त पासपोर्ट किंवा लायसन्स speedpost ने येतात तेवढाच पोस्टाचा संबंध उरलाय. तस postal saving bonds व तत्सम प्रकार अजुन अस्तित्वात आहेत. पण पोस्टाच आपल्या आयुषातल अविभाज्य अंग व गरज कमी झालीय व कमी होत आहे. 
असो, कालाय तस्मै नम:

पत्र खुप लांबल का? कंटाळवाण झाल का?
तस असेल तर कान पकडून माफी मागतो.
धन्यवाद

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?