तवा पुराण डोशांची कथा



गजाननाला नमस्कार करुन व माफी मागून या कथेची सुरुवात करतो.

या कथेतील कोणतेही पात्र काल्पनीक नाही तर सर्व पात्रे खरी आहेत. कोणतीही घटना वा पात्रातील साम्य हा योगायोग नसुन ही सर्व पात्रे हि.हा.रा.चीं.पटवर्धन हायस्कूलच्या ७२ बॅचमधे हाच मोठा योगायोग. ५० वर्षानंतर नोव्हेंबर २०२२ मधे GT ला परत भेटले हा दुसरा योगायोग आणी परत परत भेटत राहिले हा सहयोग.

तर आता आपण कथेकडे वळू. कोणत्याही कथेची सुरुवात जशी 'कोणे एके काळी ... एक आटपाट नगर होते...' तशी या कथेची सुरुवात सांगली या आटपाट नगरी बहुतेक GT च्या नंतर लगेच थोड्या दिवसात Whatsapp वरील संवादाने झाली. कुठून सुरुवात झाली हे संभ्रमात असल तरी डोसे बनवण्यावर चर्चेने (वादाने नाही) झाली. बहुतेक सतीशने  मैत्रीणीना डिवचले. अनीताने तयारी दाखवली की मी डोसे करुन खायला घालीन पण मला नवीन डोसा तवा मिळाला पाहिजे. आता गंभीर चर्चा whatsapp वर सुरु झाली व काही दिवस चर्चेचे गुर्‍हाळ सुरु राहिले. गजाभाऊने entry मारली व जाहिर केले की कोणी ५० मित्रमैत्रीणीना डोसे खाऊ घालणार असेल तर मी तवा द्यायला तयार आहे. गीफ्ट की कन्सेशनमधे हे नीट कळले नाही. दरम्यान अनीता मुंबईनगरी निघून गेली. डोसे कुणाला मिळाले नाहीत. तवापुराण सुरु राहिले. 
मधेच आस्मादिकानी कथेत उडी घेतली. एक कवीता लिहून whatsapp वर पोस्ट केली

आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी 
मैत्रीण कशी असावी तर अशी असावी❤️
आपली खरच काळजी करणारी
प्रेमान आपली कौतुक करणारी
चुकल तर धाक दाखवणारी
कधी जीभ काढुन वेडावून दाखवणारी
अशी आयुष्यात एक तरी मैत्रीण
असावी😛
सर्व मित्रमैत्रीणाना एकत्र बांधुन ठेवणारी
यारे घरी डोसे खाऊ घालते म्हणणारी
आयुष्य आनंदाने व हसत जगणारी
मित्रमैत्रीणींमधे स्वछंद बागडणारी
अशी आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी😃
मैत्रीण कशी असावी तर अशी असावी
🌹😃🙏

मैत्रीणीनी कवीतेला दाद दिली पण डोसे नाही.
कथा पुन्हा एकदा चर्चेत आली.

संध्यानी तवे गजाभाऊंच्या दुकानी घेतले व बीडनगरी घेऊन गेली. डोसे मीळाले नाहीत, कथा चर्चेत.

पुराणातील साठा उत्तरी कथा पांचा उत्तरी सुफळ सपुर्ण होतात. पण ही कथा संपुर्ण न होता परत परत सुरु होते. 

कोणा मैत्रीणीने पन्नास नाही किमान पांच मित्राना प्रेमाने डोसे खाऊ घातले तर हि कथा व तवापुराण सुफळ संपुर्ण होण्याची शक्यता आहे. वाट पहात आहे. 🙏🙏

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?