शुभेच्छा
नमस्कार मित्र मैत्रीणीनो 🙏
काल परवा दसर्याला मित्रपरीवार व नातेवाईकाना शुभेच्छा फोनवर देत होतो. एका परीचिताना (हो आता मित्र म्हणू शकत नाही) फोन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांचा प्रतीसाद ' तुमच्याकडे whatsapp आणी Instgram अकाऊंट नाहीत का? शुभेच्छा द्यायला फोन करायची काय गरज आहे?'
मी निशब्द!
आज पएका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला. मला वयाने अनुभवाने खूप वर्षे सिनीयर पण एक चांगला मित्र. डोळ्याऋत पाणी आलं त्याच्या. सांगत होता 'सकाळपासून नुसते whatsapp नी facebook वर msg. तुझा एकट्याचा video call आला. खूप खूप बर वाटलं.
मी निशब्द!
Whatsapp, facebook आणी instgram नी आपल जीवन व्यापलय. धुमाकुळ घातलाय. अक्षरशा हाहाकार माजवलाय. बर काही कल्पकता? काही भावना? आली पोस्ट, कर फाॅरवर्ड! कधी तर न वाचता पण.
निदान ही पोस्ट आधीच फाॅरवर्ड झालीय का हे तर बघा. Cricket Broadcasting ची पोस्ट माझ्या एका ग्रुपवर काल एकदा व आज आतापर्यंत दोनदा फाॅरवर्ड आली. मला तक्रारीला वाव कुठे आहे?
Whatsapp, facebook कांवा instagram बद्दल माझी तक्रार नाही. खूप चांगले App आहेत. उपयुक्त आहेत. पण काती त्यांच्या आहारी जायच? सर्व नातीगोती मैत्री virtual करायच? आपण ठरवायचय.
मी निशब्द!
मी काही चुकीच मांडल असेल तर whatsapp वर मला शीव्या घाला. माझी चुक दाखवा.
माझ म्हणण पटल असेल तर फोनवर सांगा. तुम्हालाही बर वाटेल. मलाही आनंद होईल. 🙏