साठवण : मनातल्या आठवणी १

B Pharm पदवी प्राप्त झाल्यावर Internship साठी मुंबईला निघालो. सांगलीहून बसने ५ जण incidentlly ५ हि जण मुंबईला पहिल्यांदा जात होतो. आमची एक महिना रहायची सोय UDCT Hostel ला होती व माझी Internship Glaxo, Worli इथे. माटुंगा ते वरळी बस रुट समजून घेतले. उत्साहात सेंट्रल वेस्टर्न रेल पास काढले. जीवाची मुंबई करायला सज्ज.
Intrnship सुरु झाली पण पुढे काय? 
Interviews देणे सुरु केले.  नशीबाने Internship संपायच्या आधी नोकरी मीळाली. पोस्ट Trainee Production Chemist. फॅक्टरी जोगेश्बरी ला. रहायला जागा हा प्रश्न फारसा भेडसावला नाही. शरद खानापूरकर व मिलींद कुलकर्णी बचपनके दोस्त Veternary college ला होते व त्यानी त्यांच्या हाॅस्टेल रुममधे मला Parasite सामावून घेतले. 
रहायचा प्रश्न तात्पूरता का होईना सुटला होता. कामाला सुरुवात केली. काॅलेजमधे Single Punch manual Tablet Machine बघीतले होते. चाक फिरवत एकावेळी एक Tablet बनायची. इथे सर्व (८ machienes) 37 Station Rotary Tablet compressing machienes. एका मिनीटात ७०० Tablets बनवणारी. याची जोडणी आपल्याला जमेल का? याच्यावर काम करणे? धाकधूक प्रचंड होती. ४ वर्ष आपण काय शीकलो यावरच क्षंका यायला लागली. थोडा seroiusly अभ्यास केला असता व Practicles नियमीट Attend केली असती तर थोडे तरी आले असते ना?
असो ८ दिवस नीट गेले. थोडा रुळलो होतो. Enzyme Tablet प्राॅडक्शन चालू होते तर सेक्शन हेडने बोलावले.Anagesic Tabletting मधे problem येतोय. Capping (tablet बाहेर पडताना टवका उडणे) आहे. सगळ्या टेस्ट करुन झाल्या Problem डिटेक्ट होत नाहीय तर तु तीकडे जा आणी काय आहे ते बघ. 
मी उडालोच. सर तीथे Senior Production Chemist आहे. Problen कळत नाहीय तर मी जाऊन काय करणार? हेड ऐकायला तयार नाही. "तू तीथे जा मग बघू."
मी बापडा गेलो तीकडे. मशीनवरचा Skilled worker गालात हसत "या साहेब. सांगा काय करायचे?"
मी "मला नाही माहित हेडने उगाच मला अडकवले."
Woker " तुम्ही पुर्ण Roster (15 days) इकडे आहात ना? मला तो Chemist नकोय. आमच अजीबात जमत नाही."
माझ्या होकारावर तो खुश. साहेब दोनच मिनीटं म्हणत त्याने punches वर लावलेल Glycerine पुसल व मशीन चालू केलं काहि प्राॅब्लेम नाही सार सुरळीत.
आयुष्यातला एक फार मोठा धडा शीकलो.
"Man behind machiene can make or break your career."

Popular posts from this blog

गुरू जो राखी

गेले ते दिवस

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?