साठवण : मनातल्या आठवणी — मनोगत
मनातल्या आठवणींचा दुसरा भाग लिहीण्याआधी हे मनोगत लिहीतोय.
विवेक, अलका, सतीश, संध्या व सर्व जीवलग यांच्या आग्रहामुळे आठवणी लिहायला सुरुवात केली. त्याआधी सौ. वसुधा रिटायर होताना पहिली कविता केली. मुलीने उत्साहाने Blog सुरु करायला लावला.
खरे तर कित्येक वर्षे माझ लिखाण हे Product Promotion, Scientific Writing and Corporate Booklets इतकेच मर्यादित होते. आपल्याला बाकी काहा लिहीता येण्याची गरज भासलीच नाही. थोडक्यात लिखाणाबाबतीत Unconcios Incompetence या स्टेजमधे होतो.
मग घरकुलशी जोडला गेलो. मतीमंद मुलांसाठी, व्यक्तींसाठी काम करणार्या या संस्थेचे काम आवडले. त्यानी संस्थेची माहितीची मराठीतील Literatures ईंग्रजीत Transcript करण्याबद्दल विचारले. हे आपल्याला जमणार नाही ह्याची जाणीव होत होती. Unconcious Incompetence वरुन Concious Incompetence स्टेजला आलो.
घरकुल ला भेट देणार्या व्यक्तीना त्यांचा घरकुलातील फोटो सुंदर चारोळी लिहून द्यायची प्रथा आहे. बर्वे सर सुरेख चारोळी लिहीतात कविता करतात. बर्वेसरबाहेरगावी असताना एका रवीवारी भेट देणार्या सांठी मी चारोळ्या लिहील्या. सरानी कौतुक केल आणी फिल्म बनवायची होती त्याच Script लिहिण्यासाठी स्फुर्ती पण दिली. खुप प्रयत्न करुन परत परत लिहून Script तयार झाली. श्री. दिलीप प्रभावळकर यांचा Voiceover मीळाला. फिल्म UTube वर प्रकाशीत झाली. चांगला प्रतीसाद मीळाला. उत्साह वाढला. लिहायला जमतय अस वाटायला लागल.
थोडा आत्मवाश्वास आला. Uglyduckling वर लिहीले.मीत्राना घरच्याना आवडले. माझ्या मुलीने श्रुतीने Blog सुरु कर असा हट्ट धरला. HHRCP७२मीत्रानी पण सुचवले. Blog सुरु केला. थोड लिहीत गेलो. लिखाणाचा प्रवास Concious Competence पर्यंत पोचला.
पण अजुनी लिहायला भीती वाटते. आपण लिहीलेलं मीत्रमैत्रीणीना घरच्पाना आवडेल का हि शंका असते. स्वताला Underestimate करण्याची Underperformance ची भीती सतावते.
हि भीती कशी घालवायची? Unconcious Competence स्टेज पर्यंत कसे पोहचायचे?
माहित नाही. लिहीत रहातो.
मनातल्या आठवणी पुढचा भाग लवकरच लिहीन.