साठवण : मनातल्या आठवणी ३
आता कंपनीत जाऊन Production Chemist पोस्टचा राजीनामा द्यायचा. नविन जाॅब Training क्लीअर करायचे. तसे B Pharm graduate असल्याने scientific and products ट्रेनींग चे एवढे टेन्शन वाटत नव्हते.
इकडे राजीनामा सादर केला. थोडासा retain करायचा councilling चा प्रयत्न झाला. पण दिवस अखेर Relieving Letter मीळाले. तोपर्यंत Skilled Workers ग्रुपने निरोप समारंभ आयोजीत केला. Workers नी Chemist साठी असा समारंभ करणे थोडेसे नवलच होते पण समाधान देऊन गेले.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे नविन कंपनीत पोचलो. Joining चे सोपस्कार पूर्ण करता करता लंच टाईम झाला. Training Manager जेवायला घेऊन गेला. त्याने सांगीतले की Training जवळपास संपत आले होते. फक्त दोन दिवस Sales training व Factory visit बाकी होते. Training Manager ने मला समजावले की तू फिल्डवर्क सुरु कर. दोन तीन महिन्यात पुढल ट्रेनींग होईल त्यावेळी तुला परत बोलवू. पुढील ट्रेनींगला बोलावले तर नाहीच पण पुढील कुठल्याच कंपनीत मला Proper Training मीळाले नाही. काय नशीबाची गंमत बघा. मी ट्रेनींग मधे करीअर केलं. एक चांगला Trainer म्हणून नाव कमावलं. पण मलाच कधी नीट ट्रेनींग मीळाले नाही. असो.
Sales training चा पहिला दिवस नीट गेला. दुसर्या दिवशी ट्रेनींग नंतर रात्रीच्या बसने औरंगाबादला जायचे होतेFactory Visit साठी. ट्रेनींग लवकर संपवून आम्ही चार ट्रेनी, ट्रेनींग मॅनेजर हाॅटेल रुमवर जाऊन फ्रेश होवून ९ची बस पकडणार होतो. ५ वाजता आम्ही सर्व व Miss Augustin आमची Travel Executive लिफ्टमधे शीरलो. लिफ्ट सुरु झाली आणी एक झटका देत तीसर्या व दुसर्या फ्लोअरच्या मधे थांबली. Close Lift. हवा यायला जागा नाही. फक्त एक छोटा ग्लास विंडो. त्यातून थोडा लाईट दिसत होता. सगळेच घाबरलो होतो. Travel Executive तर रडायला लागली होती. तेवढ्यात बाहेरुन ग्लास विंडो तोडला गेला आणी CEO आमच्याशी बोलायला लागला.
आणी लक्षात यायला थोडा वेळ लागला. CEO फुल्ल 3 piece suite मधे चक्क जमीनीवर झोपुन आमच्याशी बोलत होता. त्याने आम्हाला धीर दिला. लिफ्ट कंपनीच्या लोकाना तसेच BMC Emergncy Cell Team ला काॅल केलाय ते येतीलच. घाबरु नका अस सांगत होता पण भीती तर त्याच्याहि डोळ्यात दिसत होती. त्या छोट्याशा खिडकीतून त्याने Coldrinks पास केली. वेळ जात होता मदत अजुन आली नव्हती. CEO आमच्याशी बोलत होता, माहिती विचारत आम्हाला बोलायला लावत होता, जोक सांगून हसवत होता. तीन साडेतीन तासानी मदत आली आणी हुश: आम्ही बाहेर आलो. CEO ने रडतच सर्वाना हग केले. Emotional Bond आपोआप झाला.
Directors आले. जेवायला थेट Bombay Gymkhana. अजुन Shock मधेच होतो. Drinks & Dinner काय खातोय काय पीतोय कळत नव्हते.
Factory visit चे काय? उद्या बघू आज मजा करा शांत झोपा. सकाळी दहा वाजता कार आली की Office ला या.
घरी फोन करायची परवानगी विचारली.
CEO ने परवानगी दिली पण बजावले की लिफ्ट प्रकरण सांगू नका घरच्याना टेन्शन येईल.
घरी फोन केला, बर वाटलं. दिवसभरात बरच काहि घडल होतं......