साठवण : मनातल्या आठवणी ४
दहा वाजता कार आली. आम्ही Office ला पोचलो. लिफ्टमधे जायला मन धजावत नव्हतं. जीना चढत ३ र्या मजल्यावर पोचलो. सगळीकडे लिफ्ट चर्चा रंगली होती. आम्हाला बघुन आवाज दबले पण चर्चा थांबली नाही.
Training Manager आम्हा चौघाना CEO कडे घेऊन गेला. औरंगाबादसाठी फ्लाईट तीकिटे बूक झाली होती. Airport ला पोचलो. पहिला विमान प्रवास. २३ सीटर डाकोटा होते. एकच रात्र रहायचे होते त्यामुळे Light travel. जीव मुठीत घेऊन चौघेहि बसलो होतो. कच्या रस्त्यावरुन लाल डब्बा जाताना जसे धक्के बसतात तसे धक्के बसत होते. विमान एकदाचे लॅंड झाले, कार हजर होती. Ambassador Hotel ला पोचलो. मस्त झोपलो. पहिला विमानप्रवास लक्षात रहाण्याजोगा होता.
सकाळी फॅक्टरीत गेलो. माझ्या आधी काम केलेल्या फॅक्टरीपेक्षा हि advance होती. WHO GMP certified होती. अद्यावत मशीनरी, International standards processes सगळे कसे छान. Tablet polishing वर मी प्रश्न विचारला. Production chemist जो बरोबर होता त्याला माहिती नव्हती. त्याने Production Manager ला बोलावले. एक सुखद धक्का! Production Manager कराड फार्मसी काॅलेजचा माझा Senior. आता आम्ही V I P guest होतो. फुल्ल बडदाश्त. फॅक्टरी दाखवायला senior team. औरंगाबाद दर्शन वेरूळची लेणी पहायला Spl Guide व कारची सोय. माझी काॅलर ताठ.
औरंगाबाद मुंबई परतीचा ट्रेन प्रवास विना अडथळा तसेच Office formalities संपवून सांगलीला आलो.Manager ला रिपौर्ट केला. नविन कामाला सुरुवात झाली.
नविन काम नविन ओळखी नविन कौशल्य शीकणे दिवस भराभर जात होते. काम आवडत होते जमत होते. हि सुरुवात होती, पुढचे टप्पे गाठायचे होते....