साठवण : मनातल्या आठवणी २
मी मनोगत आपल्या सर्वांसमोर समोर मांडले. थोडक्यात माझी Fear of failure स्थिती आपल्या समोर ठेवली.पण आपण सर्वानी जीवलगानी, मीत्रमैत्रीणीनी व सहकार्यानी लिखाण चालू ठेवण्याचा प्रेमळ सल्ला दिला, कौतुक केले, उत्साह वाढवला. थोडक्यात लिहायला उद्युक्त केले. तेंव्हा आता पुढील आठवणीना शब्दात मांडायला सुरु करतो.
Trainee Production Chemist चा पहिला धडा तर सुंदर होताच. Manage the Man, Machine will be Managed Automatically. ह्याचे मला दोन फायदे झाले. एक हेड खुश, दोन त्या Skilled Worker ने जणू माझ्या डोक्यावर हात ठेवला. Tablet Production च्या खाचाखोचा शीकवायला सुरुवात केली. मशीन सेट कसे करायचे, टॅबलेटचे Hardness किती आणी कसे मॅनेज करायचे, टॅबलेट weight uniformity कशी adjust करायची आणी सगळ्यात महत्वाचे आणी अवघड फिल्म आणी शुगर कोटींग करताना coating thickness पर्फेक्ट येण्यासाठी टॅबलेट दोन बोटांच्या चीमटीतून कशा सोडायच्या ह्याचे य्रशिक्षण मला त्याच्याकडून मीळाले. आजदेखील फॅक्टरीत मी जेंव्हा solutions देतो तेंव्हा मनोमन मी त्या नाईकचे आभार मानतो.
तीन महिने होत आले होते. अजुन काती दिवस Parasite रहायचे? जागा पहात होतो तर सांताक्रुजला Highway लगत One RK दुसर्या मजल्यावर Rent वर मीळाली. खुपच सोइस्कर, मार्केट व स्टेशन जवळ. Owner ती व बाजूची रुम पण विकायला तयार होता. ७८/७९ साली ५० हजारात 2BHK, घेतली असती तर...तर आज करोडपती असतो. पण आपल Badluck च खराब. सुचल नाही, पटल नाही का जमल नाही? शेवटी जे नशीबात असते तेच आपल हेच खरं!
नावामागच Trainee जावून आता Production Chemist झालो होतो. सगळ सुरळीत चालू होतं आणी त्याचाच कंटाळा येवू लागला.
रोज फॅक्टरीत यायच Raw material वजन करायच mixing , granulation करायच Tabletting पॅकींगला पाठवायचे आणी Next Product तयारी सुरु. रुटीन चालू No thrill. विचार केला Sales & Marketing का नको?
Interviews सुरु. थोड्याच दिवसात MR जाॅब मीळाला तो पण सांगलीला. मग काय स्वारी खुश. इतकी की पुढील आठवणी लौकरच!!!!