Posts

मेडिसीन्स एक्स्पायरी डेट या विषयावरची पोस्ट बरीच व्हायरल झालीय. माझ्या 7 ते 8 ग्रुपवर पण फिरते आहे. मी त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. पण तीनएक दिवसापुर्वी दोनतीन डाॅक्टरांकडून विचारणा झाली की exiry dae ला खरच काही अर्थ आहे का? Expiry date नंतर किती दिवस ते औषध घेणे safe आहे? त्यांच्याशी बरीच चर्चा झाली. मग कालपरवा एका senior pharma prodction managerने पोस्ट परत पाठवून माझे मत विचारले. तसे माझे विचार मांडवे असे वाटल्याने मी लिहीत आहे. सर्वप्रथम ती पोस्ट संदर्भासाठी खाली देत आहे. नंतर माझे विचार वा मते जी माझ्या अनुभवावर आधारीत आहेत व ती मांडताना कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. मतमतांतरावर चर्चेच स्वागतच असेल. 💊 औषधांच्या एक्सपायरी डेटबद्दल सत्य 1979 पूर्वी औषधांच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट छापलेली नव्हती. ही पद्धत 1979 मध्ये अमेरिकेत सुरू झाली. खालील माहिती डॉ. मोहन श्रीधर (फ्लोरिडा, USA) यांनी शेअर केली आहे. ❓ औषधे खरोखर एक्सपायर होतात का — की आपण फार्मास्युटिकल उद्योगाकडून दिशाभूल होत आहोत? लेखक: रिचर्ड आल्टशुलर कल्पना करा: तुमच्याकडे टायलेनॉल (पॅरासिटामोल) ची बाटली आहे, ज्या...

गेले ते दिवस

सहामाहि परीक्षा संपली की दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायचे. तसेच किल्ल्याचेही. मीत्रमंडळीत चर्चा सुळरु व्हायची. माती आणायला नदीकाठी कधी जायचे. कुणी कुणी जायचे? कुणी म्हणायचे मी नाहीय किल्ला करायला ...परवा आजोळी जातोय. दुसर्‍याला लगेच आठवायचे... अरे मी पण मामाकडे जाणार आहे. तीथे आम्ही शेतात किल्ला करणार! मग घरासमोर किल्ला चांगला कि शेतातला चांगला यावर गहन चर्चा. किल्ला बनायला सुरु झाला की बाबांपुढे फटाके आणायची भुणभुण सूरु. मग एक दिवस सख्खे चुलत मावस सगळ्याची वरात फटाके आणायला. बाबा काका मामा याना घरुन सुचना होत्याच की मोठे फटाके बाँब नाही द्यायचे. एकतर जीवाला घोर आणी दुपारच्या झोपेच खोबर. तरी फटाके यायचेच. मग त्याची वाटणी त्यात वाद ती मजा औरच. दिवाळीच्या फराळाची देवाण घेवाण. थंडीत ते तेल उटण खसाखसा चोळुन देणारी आई काकू. ती ओवाळणी ती भाऊबीज..... गेले ते दिवस..... दिवस पुढे गेले. आता काॅलेजच्या हाॅस्टेल रुममधे चर्चा ....पाम येताना आउच्या हातचा बेसनाच्या लाडूंचा डबा नसेल तर रुममधे एंट्री नाही हां आताच सांगून ठेवतो. अरे ए लाडू ठेव बाजूला ...इथे टर्म सुटेल की नाही याच टेन्शन आहे. उगाच पिक्चरल...

गुरू जो राखी

Please read 🙏 *आयुष्य* 🙏 गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....          कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....          अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो           आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो......          आपण मग तो बोटाने शोधायला  सुरूवात करतो......             अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया,  पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....            थोडेसे तरी वैतागतो..... या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....😀            *आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?             पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,              आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....            पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही....

जेनेरीक औषधे किंवा PCD औषधे डाॅक्टर प्रिसस्र्कीप्षनला Substitute?

सगळ्यात प्रथम निवेदन करतो की इथे मांडलेली मतं हि माझी वैयक्तीक मतं आहेत आणी माझ्या 40 वर्षाहुन अधीक या क्षेत्रातील अनुभवातून आलेली आहेत. काही अनुभवी लोकांची वेगळी मतं असु शतात व मी त्यांचा आदर करतो. माझ्या काही सहकार्‍यानी आणी मीत्रानी या विषयावर विचारणा केली म्हणून मी माझे विचार व्यक्त करत आहे. आपल्याकडे तीन प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. 1. Ethically promoted Prescription medicines 2. PCD (propaganda cum distribution) medicines 3. Generic medicines या तीन्ही मधे काय फरक आहे व काय साम्य आहे हे जाणून घेवूया. 1. Ethically promoted prescriptiom medicines: हि मेडीसीन्स कंपनीचे MR डाॅक्टरना प्रमोट करतात व हि मेडीसीन्स डाॅक्टरांर्‍या Prescripion ने केमीस्टकडून पेशंटना विकली जातात. ह्या कंपन्या पूर्ण देश किंवा बर्‍याच राज्यात operate व विक्री करतात. यातील बहुतेकांची स्वताची Production Units आहेत.  यांची मार्केट इमेज व Brand image चांगली असते व Quality perception हा महत्वाचा USP असतो. 2` PCD Medicines: काहि MR, chemist किंवा औषधी कंपन्यामधे काम करणारे कर्मचारी हि स्वताचा उद्योग सुरु करण्याची ...

How to take right decision

After a week od session on Why to take right decision, the same managers assembld to discuss on How to take the right decision. The discussion started with the following 1. You need to take decision, & 2. You need to take right decision (as discussed in previous session) Point no 1 is vital because many a times decision is not taken because of the fear of not being able to take right decision. But not taking the decision may lead to failure. You must have heard, sung or taught to your children 'Humpty Dumpty' Sir, one more jingle! You must be still reading jingle books than management books. One manager exclaimed. I ignored the comment and continued. To take a right decision a person needs either an experience or the training.  'Nobody trained us. We learned ourselves' VP retorted. I agreed with him and asked him his years of experience. 24 Years he told with great pride. I very politely asked him ' You want your managers also spent 20 plus years to learn on how...

Jack & Jill

गेल्या महिन्यात एका कंपनीसाठी 'Managers' Development Workshop' घेत होतो. विषय होता 'you should take right decision'  बर्‍याच मँनेजर्सच म्हणण होत की Making your decision is more impirtant than to take a right decision. खुप वेळा असच शीकवल जात. पण हे नेहमी शक्य नसत. मी त्या लोकाना खुप साधा प्रश्न विचारला कि जर एखाद्या मुलाने परीक्षेत लिहीले की पुणे भारताची राजधानी आहे तर Can he make it right? Can he make Pune the kingdom of India? हे पटल.  पण पुढचा प्रश्न आला. Let senior management take right decision and we follow it. Why should we take decision? आता हे खर Workshop च आव्हान होत कारण आज कोणालाच Decision घ्यायचा नसतो.कारण decision बरोबर responsibility येते ती नको असते. तसे पाहिले तर decision तर पावलोपावली घेतले जातात. आज जेवायला काय करायचे ते बारावी नंतर मेडीकल की इंजीनीअरींग डिसीजन तर घ्यावेच लागतात. बर्‍याच वेळा डिसीजन पुढे ढकलला जातो. उदाहरणार्थ B Com नंतर LLB करायचे की नोकरी करायची हा डिसीजन न झाल्याने  M Com ला admission घेतली जाते. डिसीजन दोन वर्षे पुढे ढकलला जातो...
अबू आणी अबूचे कँटीन मला Govt College of Pharmacy, Karad येथे B Pharmacy ला Admission मीळाली. काॅलेज सुरू होऊन 15 दिवस झाले होते. मेरीट लीस्ट मधे खुप खाली असण्याचा परीणान. Admission घेतली. Sports quota मधून होस्टेल admission पण झाली. खुशीतच सांगली गाठली. दोनचार दिवसानी बाडबिस्तरा घेऊन कराडला जायचे. महत्वाचे म्हणजे जायच्पा आधी Willingdon मधील FY BSc ची admission कॅन्सल करून Relieving Certificate घेणे कारण त्या शीवाय B Pharmacy ची admission Final झाली नसती. हि झाले. माझ्या काकानी जे माझे Guardian हि होते मला सांगीतले साधारण तुझा महिन्याचा खर्च 400/— ते  500/— रूपये असेल. तू जर त्यातले 100/— स्वता कमावलेस तर मला आवडेल व तुला Money Management पण शीकायला मीळेल. मीहि हो म्हणालो. कराडला आलो. हाॅस्टेलवर बिस्तरा टाकला. काँलेज गावापासून लांब नदिपलीकडे. वाटेत फक्त SGM College. त्याला लागून खाशाबा जाधवची चाळ. खाशाबा जाधव म्हणजे भारतातला पहिला Olympic Medal विजेता. 1953 Helisinki Olympics मधे कुस्तीचे Bronz Medal जींकले होते. त्याला सरकारकडून हि जमीन मीळाली होती व त्याने चाळ बांधली. काॅलेजच्या म...